Subscribe Us

header ads

परळीत तीन रिवॉल्वर व आठ काडतुसे सह एका आरोपीला अटक

 बीड स्पीड न्यूज 


परळी_परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन  तीन अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुडडे, गोविंद भताने,श्रीकांत राठोड मधुकर निर्मळ यांनी केली. ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी ही कार्यवाही केली. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जात आहे. या घटनेतील आणखी धागेदोरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत असून रात्री उशिरपर्यंतही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. असून वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात पोचले आहेत. परळी शहर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा