Subscribe Us

header ads

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ठार

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ठार झाल्याची घटना गेवराई-चकलांबा रोडवरील कोमलवाडी फाट्यावर मंगळवारी सायंकाळी उशिरा घडली. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला होता. अंबादास कदम (वय 42) रा.माटेगाव ह.मु.गेवराई असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अंबादास कदम हे मुळचे माटेगाव येथील रहिवासी असून ते मागील काही वर्षापासून गेवराई शहरात स्थाईक होते. मंगळवारी माटेगाव येथील शेतात कामानिमित्त गेले असता शेतातील काम उरकून कदम हे सायंकाळी आपल्या दुचाकीवरुन गेवराईकडे येत होते. यावेळी कोमलवाडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अंबादास कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यामध्ये कदम यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच अंबादास कदम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा