Subscribe Us

header ads

माजलगाव नगर परिषद भ्रष्टाचाराचे माहेरघर,बोगस रस्ता विरोधात याचिका दाखल करणार - शेख रशिद

बीड स्पीड न्यूज 

माजलगांव_माजलगाव शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू असून या सर्व कामांमध्ये जोरदार भ्रष्टाचार चालू आहे सदर विकास कामांची विल्हेवाट ही मोठ्या प्रमाणात चालू आहे. प्रत्येक वार्डात नाल्यांचे रोडचे विकासकामे चालू असून ही कामे फक्त कागदोपत्री आहेत. व सदर कामे ही प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कामे झाली आहेत की नाही हेही कळत नाही प्रत्येक रोड निकृष्ट दर्जाचे बनले आहे. विकास कामे ही दररोज होणारी नसून सदर कामांचा काळाबाजार करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये हनुमान चौक ते एम एस ई बी रोड  हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे तसेच हनुमान चौक ते जुना कोर्ट रोड हाही अर्धवट निकृष्ट रस्ता  बनलेला आहे सदर कामांसाठी मातीसारखे इको वापरण्यात आलेले आहे व एकदम असा हलक्या दर्जाचा सिमेंट वापरण्यात आलेला आहे सदर कामां विरुद्ध माजलगाव नगर परिषद यांना कित्येक निवेदने कित्येक तक्रारी गेलेले आहेत परंतु माजलगावचे भ्रष्ट मुख्याधिकारी हे संबंधित गुत्तेदार यांची पाठराखण करत त्यांच्या संगनमताने हा सर्व षड्यंत्र चालवत आहे व माजलगावच्या जनतेची तसेच शासनाची फसवणूक करीत आहे. लोकांच्या आशाचे व माजलगाव चे होणारे विकासाला गळफास लावून जीव घेत आहे. सदर बोगस होत असलेले काम विरुद्ध कित्येक जण आवाज उठवून बसलेत करण्यात आली परंतु माजलगाव नगर परिषद हे फक्त भ्रष्टाचार करण्यामध्ये माहीर आहे लोकांचे प्रश्न सोडविण्यास माजलगाव नगर परिषद चे भ्रष्ट मुख्याधिकारी तसेच नगरसेवकांनी कशी ही दखल घेतली नाही किंवा त्याविरुद्ध उभे राहिले नाही उलट माजलगाव आतील विकास कामांची होत असलेली दुर्दशा पाहण्याची भूमिका निभावली आहे. कित्येकदा  नगर परिषद  विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडेही तक्रारी केलेले आहेत परंतु त्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही त्यामुळे सदर बोगस कामा विरुद्ध व माजलगावचे भ्रष्ट मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी यांचे विरुद्ध शेख रशीद हे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे न्याय मागण्यासाठी याचिका दाखल करणार आहेत अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशीद यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा