Subscribe Us

header ads

गजानन सूतगिरणीला आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक!


बीड स्पीड न्यूज 

बीड_तालुक्यातील पिंपळनेरपासून जवळच असलेल्या ईट येथील गजानन सहकारी सुतगीरणीला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली. दरम्यान अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात ईट येथे गजानन सहकारी सुतगीरणी आहे. या सुतगीरणीच्या माला ला परदेशातून मोठी मागणी आहे. दरम्यान सध्या सणासुदीचे दिवस असून शुक्रवारी पहाटे या सुतगीरणीला अचानक आग लागली. ही आग सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर बीड व परळी येथील अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीने मोठे रौद्र रूप धारण केले असून या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते. या सुतगिरणीत असलेल्या मोठ-मोठ्या मशिनरी, सुत आदी लाखों रुपयाचा माल जळून खाक झाल्याचे माहिती आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा