Subscribe Us

header ads

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आयोजित मशाल रॅली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे आयोजन; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

बीड स्पीड न्यूज 


ना जाती साठी
ना पाती साठी
एक दिवस पोलिसांसाठी
२६ नोव्हेंबर ला जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा

प्रत्येक घरात हा विषय पोहचवा

बीड_ 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी मुंबई वरती आतंकवादी हल्ला केला.या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांकडे कोणतेही अत्याधुनिक शस्त्रास्त्र नसतानासुद्धा खूप हिमतीने दहशतवादाचा सामना करून देशाचे व राज्याचे रक्षण केले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये शहीद जवानांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली कार्यक्रम व मशाल रॅलीचे आयोजन करत आलेली आहे.२६ नोव्हेंबर ला जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा  आपले आपले कर्तव्य पार पाडू पोलीस यांच्या पाठीशी ठाम उभे राहू. त्या मशाल रॅलीत सामील होऊ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आयोजित मशाल रॅली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे आयोजन
एक दिवस पोलिसांसाठी 26/11 व कोरोना मूळे शाहिद पोलीस अधिकारी कर्मचारी यांना श्रद्धांजली देण्या साठी चला उठा मी येतोय तुम्ही ही या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल सुभाष रोड ते अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय बीड असे स्वरूप राहील ठीक 04:00 वाजता उपस्तीत राहा मी येणार तुम्ही ही या  
घरातून निघाल्यावर जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणू असे आव्हान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष गणेश पवार ,आकाश गायकवाड युवक आघाडी राज्य सचिव, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल चांदमारे, विद्यार्थी उपजिल्हाध्यक्ष रणवीर पवार, संपर्कप्रमुख महेश ढाकणे, उपाध्यक्ष रवी मुंजाळ, उपाध्यक्ष सौरभ परळकर, शहराध्यक्ष गौरव कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष आनंद मगर, विद्यार्थी शहर अध्यक्ष सुलेमान खान, यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा