Subscribe Us

header ads

परळी नगर परिषदेतील एकाधिकारशाही थांबली पाहिजे; मूलभूत सुविधा पूर्ततेसाठीच्या व्यंकटेश शिंदे यांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेड व एमआयएम चा पाठिंबा

बीड स्पीड न्यूज 

परळी (प्रतिनिधी) शहरातील विविध मागण्यासाठी परळी नगरपरिषद समोर  शिवसेना तालुकाप्रमुख व्‍यंकटेश शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेड व एमआयएम कडून पाठिंबा देण्यात आला आहे. परळी नगर परिषदेवर एकाधिकारशाही चालू असून परळी नगरपरिषद मध्ये सत्ताधारी शिवसेना भागीदार असलेले महा विकास आघाडीचे सदस्य शिवसेना  नगरसेवक यांच्यावर आपल्या सत्तेच्या विरोधात उपोषण करण्याची वेळ यावी ही अत्यंत   खेदजनक गोष्ट असून नगर परिषदेमध्ये  अनागोंदी कारभार चालू असून सत्तेतील मित्रपक्षाला  केराची टोपली दाखवण्यात येत असेल तर बाकीच्याचे काय हाल असतील याचा विचारच करायला नको. असा आरोप संभाजी ब्रिगेड, एम आय एम च्या वतीने करण्यात आला.  गेल्या पाच वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर परळी शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्णपणे स्पष्ट बहुमत आहे. पण या पाच वर्षात रोड व भुयारी गटार योजना ही कुचकामी ठरली आहे.  परळी नगर परिषदेच्या मार्फत कुठल्याही प्रकारची सुखसुविधा सर्वसामान्य लोकांना भेटली नसुन फक्त त्रासाला सामोरं जावं लागत आहे. धुळीचे साम्राज्य, घाणीचे साम्राज्य, नळाचे पाणी वेळेवर न सुटणे अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे. परळीकरांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असेच म्हणावे लागेल.  नगर नगरपरिषदेच्या  या आसुरी कारभाराला नागरिक वैतागून गेले  असून  या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी लोकांनी जागृत राहून योग्य पर्याय निवडून, सत्ता आणि संपत्ती ला बाजूला सारून सर्वसामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या पक्ष आणि  लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे तरच परळीचा विकास होईल अन्यथा अजून परळीला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी सत्ताधारी करतील. असा आरोप संभाजी ब्रिगेड व एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश राव शिंदे हे उपोषणाला बसले असताना त्यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या  व एम आय एम च्या वतीने पाठिंबा देताना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज,  शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, एम आय एम चे तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई,  संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा