Subscribe Us

header ads

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही मंत्री मुंडे डान्सर नाचवतायत; माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर केली जोरदार टीका

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या कार्यक्रमावरून आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सपना चौधरी यांच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमाने अनेकांचे लक्ष वेधले होते. या कार्यक्रमावरून आता धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे.माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. त्याच मराठवाड्यातील बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे ऐन दिवाळीत डान्सर नाचवतायत. मंत्री मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केले तसेच, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीवही करून दिलीय. दरम्यान, परळीतील या कार्यक्रमाची आता महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक