Subscribe Us

header ads

लग्नाचे आमिष दाखवत दोन महिने केला बलात्कार

बीड स्पीड न्यूज 

केज_ अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत पुण्याला पळवून नेले. सतत दोन महिने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पाच दिवसाच्या पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत खंडू दत्तात्रय झिंजुर्डे याने प्रेमसंबंध निर्माण केले. जवळीकता वाढवून लग्नाचे आमिष दाखवत पुण्याला पळवून नेले.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र पोलिसांना दोघांचा शोध घेण्यात अपयश आले होते. दोन महिन्यानंतर खंडू झिंजुर्डे हा नाशिक येथे अल्पवयीन मुलीला घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ स.पो.नि. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार रियाज शेख , पोलीस नाईक डोंगरे यांनी नाशिकला जाऊन खंडू झिंझुर्डे व पीडित मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले . पीडित मुलीने दिलेल्या जबाबात खंडू झिंझुर्डे याने लग्नाचे आमिष दाखवून पुण्याला पळवून नेले . तेथे एक खोली करून तिच्यावर दोन महिने अत्याचार केला . त्यानंतर त्याच्या जवळील पैसे संपल्यावर नाशिकच्या नातेवाईकांकडे घेऊन आल्याची माहिती दिली . याप्रकरणी सदर गुन्ह्यात बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी खंडू झिंझुर्डे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . पिंक मोबाईल पथकाच्या फौजदार सीमाली कोळी पुढील तपास करत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा