Subscribe Us

header ads

बीड नगरी मधून वाहणारी करपरा नदी न.प.च्या दुर्लक्षामुळे भूमाफियाच्या घशात-----अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी


बीड स्पीड न्यूज 


बीड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय उत्कर्ष गुटे साहेब यांची तात्काळ बदली करा
______________________________________________
 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड प्रतिनिधी_बीड शहरांमध्ये असणारी ऐतिहासिक वारसा जपणारी करपरा नदी आज बीड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वास्तविक रूप न राहता फक्त एक घाणीचे साम्राज्य असलेल्या नालीच्या रूपामध्ये वास्तव्य करताना दिसत आहे या सर्व गोष्टींना बीड नगरपालिका जवाबदार आहे बीड शहर भारतामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत 67 व्या क्रमांकावर कसे येते ही खोटी माहिती पुरवणाऱ्या मुख्य अधिकारी माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब यांना व बीड शहरामध्ये विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना व जनप्रतिनिधींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही . आज आम आदमी पार्टीच्या संवाद मोहिमेमध्ये या गोष्टी निदर्शनास आल्या बीड शहरातील बालेपीर नगर नाका येथील आसपासच्या भागातील सर्व कचरा घाण पाणी करपरा नदी मध्ये टाकण्याचं काम बीड शहरातील 

नगरपालिकेच्या कृपेने होत आहे हे सर्व बघ्याची भूमिका घेत शहरातील भू माफिया या नदीपात्रामध्ये रॉ मटेरियल टाकून अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहेत व शहरातील सर्व कचरा याठिकाणी टाकून बीड नगरपालिकेची यंत्रणा हा कचरा नदीपात्रात ढकलून भू माफिया ना जागा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी वारंवार प्रशासनाला कळवत आहे परंतु बीड नगरपरिषद असं फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेऊन यांना पोसण्याचं काम करत आहे. या गोष्टीची तक्रार आम आदमी पार्टी जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना व आयुक्तालय यांना कळविण्याचे काम करत आहे. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून बीड शहरामध्ये नगरपालिकेमध्ये असलेले मुख्य अधिकारी माननीय उत्कृष्ट गुट्टे साहेब हे सगळं बघ्याची भूमिका घेऊन गप्प का बसलेले आहेत या गोष्टी वरती चौकशी झाली पाहिजे आपले बीड शहर एवढे घाणीचे साम्राज्य असून भारत देशामध्ये 67 वा क्रमांक कसा येतो या गोष्टीची देखील चौकशी झाली पाहिजे आम आदमी पार्टीची ही मागणी मुख्यमंत्र्यांना करत आहे या मोहिमेमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशोक येडे जिल्हा उपाध्यक्ष अक्रम शेख सचिव रामधनजी जमाले शहर प्रमुख सय्यद सादेक. बाळासाहेब घुमरे रामभाऊ शेरकर प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री संदीप घाडगे व समस्त नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा