Subscribe Us

header ads

बाजार स्थळाच्या नावाने झाडांची बेकायदेशीर तोड करणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करा.प्रहार जनशक्ती पक्ष.

बीड स्पीड न्यूज 

माजलगाव (प्रतिनिधि): शहरा जवळच्या राष्ट्रीय महामार्ग-६१, ५४८वरील सिंदफना नदिच्या काठावर असलेल्या न.प.च्या जुन्या पंप हाऊस च्या परिसरातील आठवडी बाजार स्थळ निर्माण करण्याचे कारण न.प.चे नगराध्यक्ष,मुख्याधिकाऱ्यां कडुन सांगात त्या परिसरातील असंख्य झाडांची बेकायदेशीर तोड केली असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अश्या मागणीची तक्रार प्रहार जनशक्ति पक्षा कडुन वनपरिक्षेत्र अधिकारी, धारूर व उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्यात कडे देण्यात आली आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष गोपाळ पैंजणे,उपाध्यक्ष अशोक ढगे यांनी म्हटले आहे की, सदर ठिकाणी ची जमीन शासकीय असुन त्याठिकाणी कित्येक वर्षांपासून असंख्य झाडे होती मात्र त्या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यासाठी कोणत्याहि प्रकारची मंजुरी जिल्हाधिकारी किंवा तत्सम कार्यालया कडुन मिळाली नाही तसेच तेथील झाडांची तोड करण्यास नगराध्यक्ष शेख मंजुर व मुख्याअधिकारी विशाल भोसले यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कडुन परवानागी घेतली नसतांनाही असंख्य झाडांची बेकायदेशीर तोड केली असल्याने पर्यावरणास घातक कृत्य केल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा