Subscribe Us

header ads

मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या ४२ पैकी २२ जणांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळात नोकरी----आरोग्यमंत्री राजेश टोपे

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या ४२आंदोलकांना आर्थित मदत तसंच सरकारी नोकरी देण्याच्या निर्णयाची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ४२ पैकी २२ जणांच्या कुटुंबीयांनी एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. इतर २० आंदोलकांच्या कुटुंबीयांनी नोकरीचा अधिकार राखीव ठेवला असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांना १० लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या ४२ आंदोलकांना आर्थित मदत तसंच सरकारी नोकरी देण्याच्या निर्णयाची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ४२ पैकी २२ जणांच्या कुटुंबीयांनी एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. इतर २० आंदोलकांच्या कुटुंबीयांनी नोकरीचा अधिकार राखीव ठेवला असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांना १० लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली जावी अशी मागणी केली जात होती. त्यानुसार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातील वारसांना शुक्रवारी १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आलं. तसंच नोकरीदेखील देण्यात आली आहे.४२ कुटुंबीयांपैकी ११ कुटुंबांना त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या घऱातील मुलाला एसटी महामंडळात दिली आहे. ११ लोक जे खऱ्या अर्थाने नियमात बसत नाहीत अशांनादेखील MSRTC ने विशेष बाब म्हणून बोर्डात मान्यता दिली असून त्यांचीदेखील भरती केली जात आहे. ४२ पैकी २२ जणांना प्रत्यक्ष नोकरी देण्यात आली आहे. उर्वरित आहे त्यांनी लहान मुलं असल्याने नोकरीचा अधिकारी राखीव ठेवला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा