Subscribe Us

header ads

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आजपासून नवीन इमारतीत

बीड स्पीड न्यूज 


उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आजपासून नवीन इमारतीत

 

बीड, दि. 03 (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड हे नामलगाव फाटा, जालना रोड, बीड याच पत्त्यावर परंतु नवीन इमारतीत दि. 4 जानेवारी 2022 पासून स्थलांतरीत होत आहे. तरी सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये तसेच नागरिकांनी कार्यालयीन कामकाजासाठी नवीन पत्त्यावर भेट द्यावी किंवा संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पूर्वीचा पत्ता नामलगाव फाटा, जालना रोड, बीड समान असून फक्त इमारतीमध्ये बदल झाला आहे, याची नोंद घ्यावी. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीडच्या जुन्या इमारतीबाबत नागरिकांसाठी सोयीसुविधा कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व जीर्ण झालेल्या इमारतीच्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कार्यालयीन कामकाजासाठी स्थलांतरीत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा