Subscribe Us

header ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीसाठी व सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही - मा. धनंजय मुंडे सर्वपक्षीय समाज बांधवांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व आ.क्षीरसागर यांना निवेदन

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):-  बीड शहरातील पेठ बीड भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची व सुशोभीकरण करण्यात यावे यामागणी साठी बीड येथील विश्रामगृह येथे सर्वपक्षीय समाज बांधवांच्या वतीने  ना.धनंजय मुंडे व आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.बीड शहरातील आंबेडकरी चळळीतील समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची व सुशोभीकरण.  यासाठी मागील काळात अनेक पक्षांकडून निवेदन देण्यात आले होते. मात्र याची कुठलीही दखल घेतली गेली नाही.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बीड मतदार संघाचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.त्या निवेदनाची दखल घेत आमदार महोदयांनी तात्काळ यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आज यासाठी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी समाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना याविषयी माहिती देत सर्व पक्षीय समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी समाजाच्या भावना लक्षात घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीसाठी व 

सुशोभीकरणासाठी तसेच भीम सृष्टी साठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल व उत्तम दर्जाचे काम करण्यात येईल असे आश्वासन दिले.याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम वंचित चे नेते अशोक हिंगे,बौद्ध महासभेचे बी. डी.साळवे, डॉ.आंबेडकर लोयर्स फोरम चे भगवान कांडेकर, रिपाइं (ए) चे बीड जिल्हाध्यक्ष किशोर कागदे, शिवसेनेचे सुनील सुरवसे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी वाघमारे, स्वारीप चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिनगारे, एकतावादी रिपाइं जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण, काँग्रेस पक्षाचे ॲड.राहुल साळवे, बहुजन विकास मोर्चाचे प्रशांत ससाणे, आंबेडकर राईट पार्टी अध्यक्ष जोजारे ए.बी. संजय गांधी निराधार योजनेचे भाऊसाहेब डावकर, वाल्मीक समाजाचे ॲड. सत्यनारायण ढाका, नगरसेवक रमेश चौहान, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, लॉयर्स फोरम चे अध्यक्ष ॲड.चंद्रमणी वीर, पत्रकार बालाजी जगतकर, बाळासाहेब जोगदंड, विजय चांदणे, हनुमंत वाघमारे,अनिल डोळस, चर्मकार समाजाचे राजू महुवाले, जयमल्हार बागल, अमोल पारवे, विनोद जोगदंड, प्रा.आनंद शिनगारे, सोनू सरवदे,लखन जोगदंड, संदीप जाधव, पंकज चांदणे, भारत कांबळे, विश्वजीत डोंगरे, युनूस शेख, विशाल सूर्यवंशी, यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा