Subscribe Us

header ads

महावितरण कंपनीने तीन गावे सोडली वाऱ्यावर

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

महावितरण कंपनीने तीन गावे सोडली वाऱ्यावर



वाकनाथपुर प्रतिनिधी_महावितरण कंपनीचा मनमानी कारभार चालु आहे वीज बिल वसूल करण्यासाठी सक्ती केली जाते ज्याचे वीज बिल थकले त्याचा विद्युत पुरवठा बंद केला जातो आणि वीज बिल वसूल झाले की गावाला वाऱ्यावर सोडले जाते अश्याच प्रकारे बीड तालुक्यातील वाकनाथपुर. रज्जाकपुर. आणि  बऱ्हाणपूर या तीन गावांना बारा दिवसापासून महावितरण कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. या तिन्ही गावात पाहिले लायनमन यांची ११ जानेवारी रोजी बदली झाल्यापासून  आज दिनांक २३ जानेवारी पर्यंत या तिन्ही गावात कोणतेही लायनमन आणखीन रुजू झाले नाहीत  आणि कोणतेही लायंनमन गावात आले नाहीत गावामध्ये काही ही  फॉल्ट झाला तर गावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन फॉल्ट काढावा लागतो लाईट बंद करून (परमिट) मागीतली तर बंद करून भेटत नाही उद्या जर  फॉल्ट काढताना काही झाले तर याला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कोणाकडून काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर भेटतात पण ते मोबाईल नंबर बंद असतात तरी वरिष्ठ अधिकारी यांनी वाकनाथपुर. रज्जाकपुर. आणि  बऱ्हाणपूर या तिन्ही गावांना लवकरात लवकर महावितरण कंपनीचा कर्मचारी द्यावा अशी मागणी होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा