Subscribe Us

header ads

परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस सह जप्त; दोन युवक ताब्यात

बीड स्पीड न्यूज 


परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस सह जप्त; दोन युवक ताब्यात



परळी_ शहरातील चांदापूर रस्त्यावर आज दुपारी पोलीस कारवाईत दोघांकडून ३ गावठी पिस्तुले व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.याबाबतची पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ये चांदापुर रस्त्यावर दोघे जण गावठी पिस्तूल घेऊन थांबले असल्याची माहिती अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांना मिळाली. त्यांनी तत्काळ परळी शहर पोलीस ठाण्यास सूचना केली. यावरून जमादार भास्कर केंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणीयावेळी संशियत दोघांची झडती घेतली असता एका जवळील बॅगेत दोन गावठी पिस्तुल व सात काडतुसे तर दुसऱ्या जवळ एक गावठी पिस्तुल आढळून आले. मनोज भरत गीते ( हाळम तालुका परळी) व नागनाथ देवनाथ ( रा. ऊखळी तालुका गंगाखेड ) अशी आरोपींची नावे आहे.दरम्यान, परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ , पोलिस जमादार भास्कर केंद्रे, तुकाराम मुरकुटे गोविंद भताने, श्रीकांत राठोड, गोरे, राजकुमार मुंडे यांच्या कारवाईत तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस जप्त करण्यात अली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा