Subscribe Us

header ads

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम; शिव जयंतीचा खर्च टाळून पालवी संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

बीड स्पीड न्यूज 


पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

 शिव जयंतीचा खर्च टाळून पालवी संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

पंढरपूर: प्रतिनिधी_ छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिव जयंतीनिमित्त येणारा खर्च टाळून तो खर्च पालवी या सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ देऊन सामाजिक भान 

डोळ्यासमोर ठेवून शिवजयंती साजरी केली आहे. या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सिंहगड महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली छञपती शिवाजी महाराज यांच्या 

पुतळ्याचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथमेश वागरे, संकेत तोडकर, रंजीतराजे लेंगरे, रोहित बागल, रोहन देशमुख, बाळू वाघमारे, सौरभ रेवे आदीसह सिंहगड पब्लिक स्कूल मधील इयत्ता अकरावी व बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येणार खर्च इतरत्र खर्च न करता तो खर्च टाळून त्या खर्चातून अनाथ मुलांसाठी काम करत असलेल्या पालवी या सामाजिक संस्थेत जाऊन शिव जयंती साजरी केली.यादरम्यान महाविद्यालयातील  प्रथमेश वगरे या विद्यार्थ्यांने छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड महाविद्यालय व पालवी संस्थेतील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शिवजयंती निमित्त पालवी संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा