Subscribe Us

header ads

चोर सोडून संन्याशाला शिक्षा: सुशिलकुमार पावरा शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 6 व्या दिवशी उपोषण सुरूच..

बीड स्पीड न्यूज 



चोर सोडून संन्याशाला शिक्षा: सुशिलकुमार पावरा

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 6 व्या दिवशी उपोषण सुरूच..

दापोली_  माझ्या मूळ कागदपत्रांसंबंधात जिल्हा परिषद रत्नागिरीला तब्बल दोन लाख दंड  आयुक्त राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाने 2 नोव्हेंबर 2015 साली ठोठावला आहे. माझी मूळ कागदपत्रे लपवून ठेवण्यात आली,माझी कागदपत्रे लपवून ठेवणारे अधिकारी सापडले. माझ्या मूळ कागदपत्रे लपवून ठेवली म्हणजेच या अधिका-यांनी एक प्रकारे माझ्या कागदपत्रांची चोरी केली. जे अधिकारी अनेक गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत व तसे चौकशी अहवालात सिद्ध झाले आहे, अशा दोषी अधिका-यांवर कारवाई करायचे सोडून जो आपली स्वतःची कागदपत्रे मागण्यासाठी लोकशाही मार्गाने   उपोषण करत आहे,अशा शिक्षकाला उपोषणाचे कारण दाखवून कारवाई केली जाते.हा चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्यासारखाच प्रकार जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासनाने केलेला आहे.मी कष्टाने व प्रामाणिकपणे खरे शिक्षण घेतले म्हणून  माझी  शैक्षणिक कागदपत्रे  या बोगस  अधिका-यांनी गायब केली आणि ज्यांनी पैशांनी व गैरमार्गाने पदव्या व प्रमाणपत्रे मिळवली,त्यांची कागदपत्रे गायब होत नाहीत. जिल्हा परिषद रत्नागिरीत ख-या शिकणा-यांवर कारवाई केली जाते आणि जे शिकलेच नाहीत, अशा बोगस अधिका-यांवर कारवाई केली जात नाही. त्यांना खुशाल नोकरीवर ठेवले जाते,अभय दिले जाते.ही अन्यायकारक बाब आहे,या दोषी अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी मी सातत्याने उपोषण करीत आहे अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.जिल्हा परिषदेतील अधिका-यांनी *माझ्या मूळ कागदपत्रांसोबतच माहिती अधिकार अर्ज,अंशदायी पेंशनचे अहवाल, शाळेचे अहवाल, आयुक्त कोकण खंडपीठ, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण  उपसंचालक कोल्हापूर,   विभागीय आयुक्त कोकण भवन,जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी इत्यादी वरिष्ठांचे आदेश* सुद्धा गायब केले आहेत, दडपून ठेवले आहेत,असा आरोप शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी व षडयंत्र कारी विजय दाजी बाईत व बोगस डिग्री धारक , दोषी नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,31 दोषारोपीत  श्री. एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे उपोषण सहाव्या दिवशीही दापोली येथे उपोषण सुरूच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा