Subscribe Us

header ads

नाथरा येथील बालसदनचा विध्यार्थी अर्जुन मुंडे चा NEET परीक्षेत 613 गुण मिळवून अंबेजोगाई येथील मेडिकल कॉलेज मध्ये एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडे यांनी केला सत्कार

बीड स्पीड न्यूज 



नाथरा येथील बालसदनचा विध्यार्थी अर्जुन मुंडे चा NEET परीक्षेत 613 गुण मिळवून अंबेजोगाई येथील मेडिकल कॉलेज मध्ये  एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडे यांनी केला सत्कार

परळी_श्रीनाथ मानव सेवा मंडळ संचलित पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथरा येथे शिक्षण घेतलेला तसेच संस्थेच्या इंदिरा बालसदन वसतिगृहात राहणारा कोयाळ येथील गरीब शेतकरी कुटुंबातील अर्जुन भगवान मुंडे याचा NEET परीक्षेत 613 गुण मिळवून अंबेजोगाई येथील मेडीकल कॉलेज मध्ये एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल  संस्थेचे डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंडे यांनीही अर्जुन मुंडे याचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी त्याला आशिर्वाद दिले.अर्जुन मुंडे याने इयत्ता 8 वी ते 10 वी असे तीन वर्षे संस्थेच्या 

पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेऊन व संस्थेच्या च्या वसतिगृहात राहून ssc बोर्ड परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने  अंबेजोगाई येथे प्रवेश घेऊन हे यश संपादन केले.अशा या सत्कार कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे(कराड) मॅडम,सहशिक्षक मुंडे मॅडम ,काळे सर,मुंडे सर ,गुट्टे सर,केंद्रे सर,भालेराव सर,गित्ते सर,संदीप सर,शेळके सर शिक्षके त्तर कर्मचारी चाटे सर ,रामेश्वर गांजरे ,अमोल फड आदिंची उपस्थिती होती या सर्वांनीही अर्जुन मुंडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.फोटो कॅप्शन:अर्जुन मुंडे यांचा सत्कार करताना डॉ संतोष मुंडे, डॉ एकनाथ मुंडे,मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे मॅडम,सहशिक्षक मुंडे मॅडम,काळे सर ,मुंडे सर,गुट्टे सर,केंद्रे सर,भालेराव सर,गित्ते सर,संदीप सर,शेळके सर,चाटे सर,रामेश्वर गांजरे,अमोल फड आदी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा