Subscribe Us

header ads

आम आदमी पक्षांच दैदिप्यमान यश भारतातील राजकारणाला विलक्षण वळण देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

बीड स्पीड न्यूज 


आम आदमी पक्षांच दैदिप्यमान यश भारतातील राजकारणाला विलक्षण वळण देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
👍👍👍👍👍


बीड प्रतिनिधी_भारतांच राजकारण आजवर अतिशय गलीच्छ पद्धतीने लढलं जात आहे जात होतं लढ़लं गेलं ही.विकासाचा मुद्दा घेवून लढ़लेलं राजकारण केवळ दिखाव्या पुरतंच असायच.

२०१४ पासुन हे राजकारण आणखिणच गढुळ व भगवकंच झालं होतं.

लबाडी खोटेपणा फेकुगिरी धार्मिक रंग मंदिर व मुसलमानांचा द्वेष वाढवून त्यांच्या विषयीच्या रोषाला खतपानी घालुन सत्ता तर मिळवलीच शिवाय ती टिकवन्यासाठी अनितीचा कळस गाठला. जेवढी कटकारस्थाने क्ॡप्त्या लढवल्या त्या मानवतेला कलंक फासना-याच आहेत.
     

जिकंण्यासाठी हिंदुत्वाच चाॅकलेट वापरलं

आम्ही मुस्लिमांच्या विरोधात आहोत हा आभास करुन
हिंदुना एवढं छळलं जातय दडपलं जातंय हिंदुच दमण केलं जात आहे कि विचारता सोय नाही.त्यांना मुस्लिम द्वैष दाखवून हिंदुना अक्षरश: नागवं केलं जात आहे. पण हेच हिंदुच्या लक्षांत येत नाही.  अतिशय जात्यंध आणी भयानक म्हणजे भारताला विनाशाकडे नेणारं राजकारण खेळलं जात आहे विरोधी पक्ष देखिल यात शामिल आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे.राजकारणांतली मोठं मोठी धेंड थोबाडं गप ठेवुन बसली आहेत नामर्द झाली आहेत..........
पाच राज्याच्या निवडणुकीत पंजाब सोडता ईतर चार राज्यांत प्रचंड गोंधळ व अनाचार करुनच व धार्मिक वाद व हिंदुत्वाच गाजर दाखवुनच जनतेला महामुर्ख बनवले.फक्त पंजाबची निवडणुक ही विकास आरोग्य शिक्षण जल कृषी रोजगार उद्योग व विविध विकास योजना वर  निवडणुक लढवली आणि अभुतपुर्व यश आप ला मिळालं.पहिल्यांदा पंजाबच्या जनतेने धार्मिकतेचा बुरखा बाजुला ठेवुन केवळ विकास आणि विकास याच विषयांवर लक्ष केंद्रीत केले.आणि गांधी घराण्याला नांव न ठेवता हिंदु हिंदु न करता  सैनीकांची शहादत न वापरता ईडीचा वापर न करता ईव्हिएम घोटाळा न करता शेतक-यांना उल्लु न बनवताही यश मिळवता येत हा संदेश भारतियांना दिला.पंजाबची जनता खरचं सुज्ञ आहे त्यांनी आपचे  दिल्लीतले महनीय कार्य जे जगात वाखाणले जात आहे. ते पाहिले आणि *आप ला* भरगच्च पुर्ण ताकदीशी निवडुन दिले.

     

उत्तर प्रदेशचे लोक केवळ मुर्खच नाही तर बावळट निघाले

शेतक-यांच आंदो लन विसरले ७५० लोकांच बलिदान विसरले गंगेच्या पाण्यांवर तरंगलेल्या शवांचा विसर पडला उण्णावचा अत्याचार विसरले.आणि परत जात्यंध व धर्मांध शक्तींना निवडुन दिले. जीवघेणी महागाई नाही दिसली सहाकोटी लोकांची बेरोजगारी नाही दिसली.
अजुन पाच वर्षांनी उत्तरप्रदेशची जनता दाणे दाण्याला महाग होईल हे नक्की आणि पंजाबची आधिच संपन्न असलेली रयत अजुन बलशाली व प्रगल्भ व वैभवशाली होईल यात शंकाच नाही.पंजाबने भारतिय राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.

आप नक्कीच पंजाबच्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतील.
खुपखुप शुभेच्छा.
भारतियांनो विकासाला मत तरच प्रगती धार्मिकतेला मत केलं तर नूसती अधोगती अधोगती

💪💪💪💪
*जय हिंद*
🙏🙏🙏🙏
*डाॅ.वसंत दाभाडे,बीड*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा