Subscribe Us

header ads

घुमरे,पटेल,नाईकवाडे,लोढा यांच्या शिवसेना जाहीर प्रक्षप्रवेश सोहळ्याचे साक्षीदार व्हा : नागेश शिंदे ,पंजाब काकडे

प्रतिनिधी नवनाथ गोरे


घुमरे,पटेल,नाईकवाडे,लोढा यांच्या शिवसेना जाहीर प्रक्षप्रवेश सोहळ्याचे साक्षीदार व्हा : नागेश शिंदे ,पंजाब काकडे  




वाकनाथपुर प्रतिनिधी-: ढेकणमोहा दिनांक 28 बीड तालुक्यातील नाळवंडी जिल्हा परिषद गटांचे सदस्य गंगाधर घुमरे यांच्यासह बीड नगरपालिकेचे गट नेते फारुक पटेल,  अमर नाईकवाडे, नितीन  लोढा ,बाबुसेठ लोढा  यांचा 28मार्च 2022रोजी सायंकाळी 6 वाजता माजी मंत्री जयदत्त  क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहे. बीड मतदार संघातील राजकारणाला कलाटनी देणाऱ्या या प्रसंगाचे साक्षीदार होण्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नागेश शिंदे आणि पंजाब काकडे यांनी केले आहे.गंगाधर घुमरे, नितीन लोढा, बाबुसेठ लोढा, अमर नाईकवाडे, फारुक पटेल यांचा बीड शहर आणि ग्रामीण भागात मोठा प्रभाव आहे. आ. संदीप क्षीरसागर यांच्या विजयात यांचाच मोठा वाटा होता. मात्र आता हेच नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हजारो कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.या पक्षप्रवेशामुळे‌ बीड मतदारसंघातील सर्व  राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तरी या ऐतिहासिक पक्ष प्रवेशासाठी नाळवडी सर्कल मधील  नागरिक व लोकनेते माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या वर प्रेम करणाऱ्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून यां पक्ष प्रवेश सोहळ्याचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बना असे आवाहन नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा