Subscribe Us

header ads

बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ४४ एकर जमीन हडपली, १० जणांवर गुन्हा नोंद

बीड स्पीड न्यूज 




बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ४४ एकर जमीन हडपली, १० जणांवर गुन्हा नोंद



बीड प्रतिनिधी/ जिल्ह्यातील वक्फ बोर्डाची जमीन बळकावल्याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ४४ एकर ८ गुंठे जमीन बळकावल्याप्रकरणी१०जणांविरोधात मंगळवारी दुपारी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.जिल्हा वक्फ अधिकारी अमीनुजमा खलीखुजमा सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नित्रूड येथे वक्फ बोर्डाच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ३६ व ३७ मध्ये ४४ एकर ८ गुंठे इनामी जमीन आहे. नित्रूड मसजिदची नोंद महाराष्ट्र राजपत्रात अनुक्रमांक १ मधील १४ फेब्रुवारी, १९७४ अन्वये आहे, तसेच महसूल अभिलेखात खीदमत मास इनाम जमीन अशी नोंद आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च, १९८२ रोजी ही जमीन हैदराबाद निर्मूलन कायद्यांतर्गत खालसा केलेली आहे.ही जमीन विक्री करण्यासाठी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून, वक्फ बोर्डाच्या औरंगाबादमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ही जमीन खालसा करत महसुली अभिलेखात फेरफार करून स्वत:च्या नावे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही बाब समोर येताच, जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

अशी आहेत आरोपींची नावे•  

प्रदीप विश्वनाथ आगाव, बिभीषण रंगनाथ बोधवड, रंगनाथ बापुराव बोधवड, अभिमन्यू रंगनाथ बोधवड, अनुराधा विश्वनाथ निरडे, शीतल गणेश इरमले, स्नेहल अभिमन्यू बोधवड, सय्यद रज्जाक सय्यद जाफर, सय्यद रईस सय्यद जाफर, प्रशांत उत्तमराव तोष्णीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा