Subscribe Us

header ads

पाचशे रुपयांची लाच घेताना पाटोदा पं. स. मधील महिला कर्मचारी पकडले!

बीड स्पीड न्यूज 


पाचशे रुपयांची लाच घेताना पाटोदा पं. स. मधील महिला कर्मचारी पकडले!


पाटोदा-:आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या वडीलांच्या नावावरील आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाचशे रुपये लाच स्विकारताना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा