Subscribe Us

header ads

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल;मराठा आरक्षण, क्रांतीमोर्चे आणि महापुरुषांबद्दल केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

बीड स्पीड न्यूज 


ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल;मराठा आरक्षण, क्रांतीमोर्चे आणि महापुरुषांबद्दल केले होते आक्षेपार्ह वक्तव्य


बीड प्रतिनिधी-: मराठा आरक्षणाविषयी मराठा समाजाने काढलेले मोर्चे आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर १७ एप्रिल रोजी येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. भाजपचे बीड तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्नील गलधर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.गलधर यांच्या फिर्यादीनुसार, १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते स्वराज्यनगर येथे घरी होते. यावेळी एका डॉक्टरांनी व्हॉटसअपवर पाठविलेला व्हिडिओ त्यांनी डाऊनलोड करुन पाहिला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले. मराठा आरक्षण हे मोगलाई पध्दतीने लुटले जाऊ शकत नाही. पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचे राज्य नाही. महागड्या गाड्या आणून लोक जमवले व ५२ मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन आरक्षण मिळत नाही. अखेर सुप्रिम कोर्टाने अँटी व्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केले. याशिवाय दिलीप पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ॲड. सदावर्ते यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आले. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अवमान करुन भीती पसरविल्याचा ठपका ठेऊन कलम १५३ (ए), २९५ (ए), ५०५ (२) अन्वये सदावतेंवर गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सपोनि अमोल गुरले
करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा