Subscribe Us

header ads

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

बीड स्पीड न्यूज 


अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार



गेवराई प्रतिनिधी-: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास गेवराई जवळील वडगाव ढोक फाट्याजवळ घडली. दरम्यान या घटनेने गेवराई तालुक्यात बिबट्याचा संचार असल्याचे समोर आले आहे. गेवराई शहराजवळील धुळे सोलापूर महामार्गावर असलेल्या वडगाव ढोक फाट्यावर रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसल्याने या घटनेत बिबट्या जागीच ठार झाला. तर घटनेनंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला. घटना घडताच घटनास्थळी नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा