Subscribe Us

header ads

आंबेडकर जयंती आणि पवित्र रमजान निमित्त अल खैर फाउंडेशन ची पाणपोई कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 


आंबेडकर जयंती आणि पवित्र रमजान निमित्त अल खैर फाउंडेशन ची पाणपोई कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ



बीड (प्रतिनिधी) आंबेडकर चौक बीड येथे आज आंबेडकर जयंती आणि पवित्र रमजान निमित्त सार्वजनिक  पानपोई च्या उद्घाटन पोलिस विभागाचे कर्तव्य दक्ष अधिकरियांचे हस्ते करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार नाथ पालवे सर, 

सहायक पोलिस निरीक्षक कैलाश भरती सर, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनकर सर, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे सर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे सर,  माजी सभा पती शेहजादा खान , अल्खैर फाउंडेशन बीड चे अध्यक्ष इंजिनियर अझहर 

इनामदार, सचिव आमिर खान,  उपाध्यक्ष मोमीन रजिउद्दिन, शेख रफत , साकिब सर, रेहान भाई, मिर्झा खैसर बेग,  यासेर खान, शेख शाहीद, असद चाऊस , बिलाल भाई आदी उपस्थित होते.ही पानपोई पूर्ण 

उन्हाळा पर्यंत चालू राहणार आहे. सामाजिक कार्य आणि आपसात बंधूप्रेम व्हावे यासाठी ही पाणपोई चालु करण्यात आली आहे. याचा फायदा मजूर, गोर गरीब, रोजदर, बाजारकरणाऱ्याना होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा