Subscribe Us

header ads

'पीएचडी’ विद्यार्थ्यांच्या फेलोशिपमध्ये वाढ करून तात्काळ जाहीरात काढा : मंत्री धनंजय मुंडे यांची मुकुंद धुताडमल घेणार भेट

बीड स्पीड न्यूज 


'पीएचडी’ विद्यार्थ्यांच्या फेलोशिपमध्ये वाढ करून तात्काळ जाहीरात काढा   : मंत्री धनंजय मुंडे यांची मुकुंद धुताडमल घेणार भेट



बीड / प्रतिनिधी-:राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना ‘बार्टी’कडून फेलोशिप दिली जाते. मात्र वाढती महागाई लक्षात घेता, ही  फेलोशिफ तुटपुंजी पडत आहे. त्यामुळे ‘पीएचडी’ करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा ५० हजार फेलोशिप देण्यात यावी. या मागणीसाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत.अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ‘पीएचडी’ धारक विद्यार्थी मुकुंद धुताडमल यांनी दिली आहे.राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची आहे. त्यात कोरोनाने आणखीन भर टाकली आहे. परिणामी अनेकांचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे, असा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे  बार्टीकडून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध महत्वकांक्षी योजनांच्या शिष्यवृत्ती आणि फेलोशिपमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. आजघडीला ‘पीएचडी’ धारक विद्यार्थ्यांना केवळ ३५ हजार रुपये प्रति महिना फेलोशिप दिली जात आहे. मात्र सदरील फेलोशिप वाढत्या महागाईमुळे कमी पडत आहे. एवढ्या कमी फेलोशिपमध्ये ‘पीएचडी’ चा शोधनिबंध पूर्ण होण्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे या फेलोशिपमध्ये प्रति महिना ५० हजार रुपये अशी वाढ होणे गरजेचे आहे. दरम्यन  सन 2021-22 मधे पिएचडीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ फेलोशिप साठीची जाहीरात काढावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी. जेणेकरून संशोधन करण्यास विद्यार्थ्यांना मदत होईल. तसेच सदरील फेलोशिप वेळेत मिळणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची या संदर्भात प्रत्येक्ष भेटघेऊन निवेदन  देणार आहोत अशी माहिती मुकुंद धुताडमल यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा