Subscribe Us

header ads

पीसीएनडीटी बेकायदा गर्भलिंग निदानबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षिस--- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.ए.साबळे

बीड स्पीड न्यूज 


पीसीएनडीटी बेकायदा गर्भलिंग निदानबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षिस--- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.ए.साबळे

 

बीड|प्रतिनिधी दि. 6 -: पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर संस्था यांची माहिती देण्यास पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शासनाच्या खबरी योजनेमधून 1 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.ए.साबळे यांनी दिली आहे.पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर संस्था यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, (जिल्हा सामुचित प्राधिकारी) जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांना द्यावी किंवा हेल्पलाईन क्रमांक 18002334475 या  क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.तसेच माहिती देण्याऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, सदर माहिती खातरजमा करुन व त्या अनुषंगाने संबंधित सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर संस्था यांचेवर न्यायालयीन प्रकरण दाखल केल्यानंतर संबंधित तक्रारदारास 1 लाख रुपयांचे बक्षीस शासनामार्फत देण्यात येईल.  असे, जिल्हा शल्य चिकित्सक  एस.ए. साबळे बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा