Subscribe Us

header ads

शासनाने बीडला पूर्णवेळ पोलिस अधीक्षकाची नियुक्ति करावी प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


शासनाने बीडला पूर्णवेळ पोलिस अधीक्षकाची नियुक्ति करावी  प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांची बदली झाल्यानंतर शासनाने प्रथम अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार साहेब यांच्याकड़े अतिरिक्त पदभार दिला नंतर पुणे येथील सीआयडी विभागाचे आयपीएस अधिकारी पंकज देशमुख साहेब यांच्याकड़े अतिरिक्त बीड पोलिस अधीक्षकाचा पदभार देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेब यांनी बीड जिल्ह्याला पूर्णवेळ एस. पी.द्यावे. या अाशयाचे निवेदन लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब व गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.कारण बीडला मटका, अवैध दारू, जुगार, अवैध वाळूचे धंदे, बेकायदेशीर सावकारी, गुंडागर्दी, अवैध राकेलचे धंदे अशाप्रकारची गुन्हेगारी बीड जिल्ह्यात बघायाला मिळते  म्हणून कायदा-सुव्यवस्था अबाधित रहाण्या करिता कायमस्वरुपी पूर्णवेळ बीडला पोलिस अधीक्षक देण्यात यावे. अशी शासनाला लोकसेना संघटनेने मागणी केली आहे.

                                 
        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा