Subscribe Us

header ads

सिरसमार्ग यात्रेसाठी भाविकांना मोफत बस सेवेसह पानपोईचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


सिरसमार्ग यात्रेसाठी भाविकांना मोफत
 बससेवेसह पानपोईचे आयोजन  




बीड / प्रतिनिधी-: गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र सुभान संतुआई देवीच्या यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांची व रसिकांची येण्या जाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने बीड शहरातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या वतीने संस्थेचे 

सचिव व शिक्षक नेते उत्तम पवार यांनी शाळेची बस मोफत देऊन   यात्रेनिमित्त सिरसमार्ग येथे  पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांसाठी  मोफत थंडगार जारच्या पाण्याची व्यवस्था केली. करोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा मोठ्या उत्साहात व जल्लोषमय वातावरणात यात्रा भरली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले. 

कुस्तीमध्ये आपले कसाब दाखविण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मल्ल (पहिलवान) मोठ्या प्रमाणात आले. कुस्त्याच्या आखाड्यानंतर रात्री विश्र्व अप्सरा ग्रुप लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . लावण्याच्या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आलेल्या रसिकांनी प्रत्येक लावणीला मनमुराद दाद दिली. रात्रौ 8 च्या दरम्यान सुरू झालेला लावण्यांचा कार्यक्रम लावण्यवतींनी सादर केलेल्या एका चढ एक लावण्यांमुळे उत्तरोत्तर रंगत गेला. यात्रेसाठी 

आलेल्या भाविकांची व रसिकांची येण्या जाण्याची सोय करण्याची  जबाबदारी  प्रफुल्ल पवार यांनी पार पाडली तर यात्रेतील सर्व नागरिकांना जारचे थंडगार पाणी मोफत पुरविण्याची जबाबदारी विनोद पाटोळे यांनी पार पाडली . सरस्वती विद्या मंदिर शाळेने प्रतिवर्षी प्रमाने यंदाही यात्रेनिमित्त आलेल्या सर्व नागरिकांना येण्या जाण्या साठी विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देऊन मोफत थंडगार जारच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक  बांधिलकी जपली. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा