Subscribe Us

header ads

विचित्र अपघातात ट्रकमधील ऊस अंगावर पडून दुचाकीवरील दोघे जण ठार

बीड स्पीड न्यूज 


विचित्र अपघातात ट्रकमधील ऊस अंगावर पडून दुचाकीवरील दोघे जण ठार


केज| प्रतिनिधी-: माजलगाव तालुक्याच्या चाडगाव येथील शेतकऱ्याचा ऊस घेऊन येडेश्वरी साखर कारखान्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रकने भवानी चौकात ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ट्रक पलटी झाल्याने रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्यांच्या अंगावर ट्रकमधील ऊस पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेजण उसाखाली दाबून जागीच ठार झाले. सदर घटना आज रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, केज शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीने शहरातील अर्धवट रस्ते खोदून ठेवल्याने ते अपघाताला करणीभूत ठरत असल्याची चर्चा अपघातानंतर नागरिकांत होत आहे.माजलगाव तालुक्यातील चाडगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तोडलेला ऊस ट्रकचालक हरिभाऊ पांचाळ रा. उमरी ता केज हे ट्रक क्रमांक एम एच ०८ एच ३०८ मधून घेऊन ते धारूर रस्त्याने केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याकडे निघाले होते. त्यावेळी, ताब्यातील भरधाव वेगातील ट्रक केज शहरातील धारूर अंबाजोगाई रस्त्यावरील भवानी चौकात आल्यानंतर बीड रस्त्याने कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिली. रस्त्याच्या कडेच्या नालीस जाऊन धडकल्याने ट्रक पलटी होवून केज शहरातील अरबाज नासिर खुरेशी (वय २५ वर्ष रा, कुरेशी गल्ली), जुबेर आसेफ शेख (वय २६ वर्ष रा. कोकिचपी) हे दोघेजण अंबाजोगाई रस्त्याकडील पेट्रोल पंपा केज कडून शहरात बुलेट क्रमांक एम एच १७ बीए ३१३ वर येत असताना
त्यांच्या अंगावर ट्रकमधील ऊस पडल्याने उसाखाली दबल्याने ते जागीच ठार झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा