Subscribe Us

header ads

मुंडे बहिण-भावाचे अबॅकसमध्ये यश; प्रियदर्शनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड तर पृथ्वीराजला मास्टर मेरीट मानांकन

बीड स्पीड न्यूज 



मुंडे बहिण-भावाचे अबॅकसमध्ये यश; प्रियदर्शनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड तर पृथ्वीराजला मास्टर मेरीट मानांकन

बीड ः प्रतिनिधी-: शहरातील दत्तनगर भागातील रहिवाशी प्रियदर्शनी महादेव मुंडे व पृथ्वीराज महादेव मुंडे या बहिणी-भावाने अबॅकसमध्ये यश मिळवले आहे. प्रियदर्शनीने राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवले असून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर पृथ्वीराजला अबॅकस राष्ट्रीय मॅथ चॅम्पियनशिपमध्ये मास्टर-मेरीट मानांकन मिळाले आहे. या दोघांचा सामाजिक न्याय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.प्रियदर्शनी महादेव मुंडेने अबॅकसमध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट बौद्धिक क्षमता दाखवली. तिची उत्कृष्ट स्पर्धक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप 

लर्नर्स कॅप्सूल दिल्ली यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या परिक्षेचा 10 मे  रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या परिक्षेत नेपाळ, श्रीलंका आणि भारतातील चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पृथ्वीराज महादेव मुंडे याने 8 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडविण्याचा विक्रम केला. त्याला अबॅकस मॅथ्स सर्वोत्कृष्ट मानांकन पारितोषिक मानांकन मिळाले आहे. मुंडे बहिण -भावाच्या या यशाबद्दल सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सी.ए. बी बी जाधव, पत्रकार संतोष मानुरकर, पत्रकार दिनेश लिंबेकर या मान्यवरांच्या हस्ते व सत्कार करण्यात आला. प्रियदर्शनी व पृथ्वीराजने मिळवेलल्या यशाबद्दल त्यांचे डॉ. एस.ए.घोडके यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक, नातेवाईकांनीअभिनंदन केले आहे.

 प्रियदर्शनी व पृथ्वीराज मुंडे यांचा सत्कार करतांना बी.बी. जाधव, संतोष मानुरकर, दिनेश लिंबेकर.
----------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा