Subscribe Us

header ads

एक हजार रुपये ब्रास वाळूसाठी अर्ज करावेत; आमदार पवार, तहसीलदार खाडे यांचे आवाहन

बीड स्पीड न्यूज 


एक हजार रुपये ब्रास वाळूसाठी अर्ज करावेत; आमदार पवार, तहसीलदार खाडे यांचे आवाहन


गेवराई प्रतिनिधी-: ज्या नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास वाळू खरेदी करायची असेल त्यांनी थेट गेवराई तहसील कार्यालयात मागणी अर्ज करावा, असे आवाहन आ. लक्ष्मण पवार व तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून वाळू घाट सुरू असतानाही नागरिकांना वाढीव दरात वाळू विक्री सुरू होती. या विषयावर आ. पवार यांनी मतदारसंघातील नागरिकांना कमी दरात वाळू मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.त्यानंतर, प्रशासनाने लेखी आदेश दिल्यानंतरही ठेकेदाराकडून वाळू दर कमी होत नसल्याने आ. पवार यांनी रविवारी गेवराई तहसिल कार्यालयात तहसीलदार खाडे व वाळू ठेकेदार यांची बैठक घेऊन नागरिकांना कमी दरात वाळू मिळावी यासाठी आदेश दिले. नागरिकांनी आता कमी दरात वाळू मिळवण्यासाठी तहसिल कार्यालयात मागणी अर्ज करावा असे आवाहन आ. लक्ष्मण पवार व तहसीलदार सचिन खाडे संयुक्त आवाहन केले आहे.दरम्यान, मागील काही वर्षांपासून गेवराई तालुक्यातील वाळू प्रश्न काही सुटत नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीला अवैध वाळू उपश्याचा प्रश्न होता त्यानंतर वाळू घाटाचे लिलाव झाले तरी नागरिकांना ज्यादा दराने वाळू मिळू लागली त्यामुळे आमदारांना उपोषण करण्याची वेळ आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा