Subscribe Us

header ads

चार हजारांची लाच स्वीकारताना आष्टीत ग्रामसेवक अटक

बीड स्पीड न्यूज 


चार हजारांची लाच स्वीकारताना आष्टीत ग्रामसेवक अटक

आष्टी - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी करुन चार हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आष्टी येथील पंचायत समिती आवारात १३ जून रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आली.किरण दगडू वनवे असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते धनगरवाडी (ता. आष्टी) ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होते. गावातीलच ४८ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थीच्या शेततळ्याचे मजुरांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक किरण वनवे याने पाच हजार रुपये लाच मागणी केली. याबाबत पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. आष्टी येथे पंचायत समितीसमोर तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. आष्टी ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा