Subscribe Us

header ads

शिवतीर्थाजवळील रस्ताकामासंदर्भात नियोजनासाठी आ.क्षीरसागर स्वतः रस्त्यावर संबंधित यंत्रणा, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत केली चर्चा

बीड स्पीड न्यूज 


शिवतीर्थाजवळील रस्ताकामासंदर्भात नियोजनासाठी आ.क्षीरसागर स्वतः रस्त्यावर
संबंधित यंत्रणा, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत केली चर्चा


बीड दि.१४ (प्रतिनिधी): शहरातील बायपास-टू-बायपास रस्त्याचे  काम सध्या सुरू आहे.या रस्त्याचे काकू-नाना हॉस्पिटल पासून ते शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम आटोपले आहे.आता पुतळ्याच्या चारही बाजुंच्या रस्ताकामाला सुरूवात करण्यात येणार 

आहे.या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.१४) रोजी त्याठिकाणी जाऊन रस्ताकामाच्या काळात व्यवस्थापनाच्या संदर्भात नियोजन केले.शहरातून दोन्ही बायपास जोडणर्‍या, बायपास-टू-बायपास रस्त्याचे काम सुरू असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.पुढील २ ते ३ आठवड्यांमध्ये पुतळ्याजवळील काम पूर्ण होण्याचे नियोजन 

आहे.शहरातील मध्यवर्ती असा हा शिवाजी महाराज चौक आहे.याठिकाणी चारही बाजूंनी वाहतूक सतत सुरू असते.येथील रस्त्याचे काम  सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) रोजी आ.संदीप क्षीरसागर स्वतः रस्त्यावर येऊन वाहतूक पोलीस अधिकारी,राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यासोबत चर्चा केली व संबंधितांना योग्य त्या सुचना केल्या.या रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सुचना केल्या असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा