बीड स्पीड न्यूज
कपिलधार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ही कपिलधारवाडी गावं विकासापासून वंचित
बीड|प्रतिनिधी-: बीड शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले सुंदर असे कपिलधार हे गाव. पावसाळा आला की, डोगंराच्या प्रत्येक दरी आणि कपारीतुन खळखळ पाणी वाहू लागते हे पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जाते. कपीलधारवाडी पासुन 1 किलो मीटर अंतरावर सुंदर असं पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रसिद्ध कपीलधार धबधबा आहे. उंच उंच डोंगरावरून येणारे पाणी पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कपिलधार या
बीड|प्रतिनिधी-: बीड शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले सुंदर असे कपिलधार हे गाव. पावसाळा आला की, डोगंराच्या प्रत्येक दरी आणि कपारीतुन खळखळ पाणी वाहू लागते हे पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जाते. कपीलधारवाडी पासुन 1 किलो मीटर अंतरावर सुंदर असं पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रसिद्ध कपीलधार धबधबा आहे. उंच उंच डोंगरावरून येणारे पाणी पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कपिलधार या
ठिकाणी येत असतात. अतिशय रमणीय आणि मन प्रसन्न करणारे हे तीर्थक्षेत्र आहे. कपिलधारच्या जवळच डोंगर माथाच्या कडेला 450 लोकसंख्या असलेलं कपिलधारवाडी हे गावं आहे. गावाच्या चोही बाजूला डोंगर असून मध्ये दरीच्या मध्यभागी शेतकऱ्यांची शेती आहे. येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून, येथील नागरिकांना सकाळी आठ वाजता कामासाठी शहर आणि इतर ठिकाणी बाहेर जावे लागते. जवळचा अवघ्या काही अंतरावर कपिलधार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ
असूनही कपिलधार वाडी हे गाव गेल्या 75 वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. या गावात सेन्टेन्स सोशल सेंटर सामाजिक संस्थेच्या वतीने काम सुरू असून, अँनी सिस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन भेट देत असतात. गावात भेटी दिल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ही बाब सामाजिक कार्यकर्ते मनीषा स्वामी, रेवती धिवार, ज्योती वाघमारे, विनोद शिंदे, मनीषा घुगे, राजश्री सांगळे यांच्या निदर्शनास आली. अतिशय
रमणीय वातावरण असलेल्या कपिलधार वाडी येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावर पावसाळा सुरू झाला की उंच डोंगरावरून येणारे दगड घरावर येऊन पडतात. यासाठी गावकऱ्यांनी मिळून एक नाला तयार केला होता. पण आता हा नाला पूर्णपणे दगड व मातीने भरून गेला आहे. यामुळे पावसाळा सुरू झाला की येणारे दगड कपिलधार वाडी येथील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावर येऊन पडतील. पावसाळ्यामध्ये दगड आणि जोराच्या वाहणाऱ्या पाण्याचा त्रास येथील
ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या असून खाली दरी मध्ये उतरून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. येथील शेतकऱ्यांची शेती खोल दरी मध्ये असल्यामुळे खाली जाऊन शेती मध्ये पीक घ्यावे लागते. पिकाची काढणी झाल्यानंतर शेतीमध्ये निघालेला शेतीमाल डोक्यावर ओझे घेऊन उंचावर कपिलधार वाडी या ठिकाणी मार्ग काडीत यावे लागते. पाऊस सुरु असेल तर पाय घसरून पडण्याचा धोका जास्त आहे. या ठिकाणी कोणताही चांगला
जाण्यासाठी आणि येण्यासाठी रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या कपीधारवाडी या़ गावात महिलांसाठी एक ही स्वच्छालय नाही. घरकुलाचा कोणालाही लाभ मिळालेला नाही. कोणतीही योजना कपिलधारवाडी या गावात आजपर्यंत राबवलेले नाही. गावातील ग्रामस्थ बोलतात की, गावात योजना दाखवा आणि बक्षीस मिळवा" ! असं गावकऱ्यांकडून बोललं जात आहे. येथील मुलं आणि मुलींना चौथीपर्यंत शाळा गावातचं आहे, पुढील शिक्षणासाठी त्यांना मांजरसुंबा या ठिकाणी जावे लागते. कपिलधार वाडी ते मांजरसुंबा हे चार किलोमीटरच अंतर असून विद्यार्थ्यांना याठिकाणी पायी चालत जावे लागत. या मुलांसाठी महामंडळाच्या बसची सुविधा नाही. ग्रामस्थांकडून अर्ज, निवेदन देऊन या गावांमध्ये बस सुरू झाली नाही. कपिलधार वाडी तील विद्यार्थ्यांना आठ किलोमीटरचा जाण्या-येण्याचा प्रवास रोज नित्यनियमाप्रमाणे पायी करावा लागत आहे. या ठिकाणचा मुलं आणि मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सेन्टेन्स सोशल सेंटर या संस्थेच्या वतीने येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. कपिलधार वाडी येथील ग्रामस्थ, महिला, शेतकरी यांना मार्गदर्शन केले जात आहे. येथील ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यास निश्चितच या गावांमध्ये विकास होईल. कपिलधार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असूनही कपिलधार वाडी हे गेल्या 75 वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेले गाव नक्कीच विकसित होईलं.
विनोद शिंदे बीड...
0 टिप्पण्या