Subscribe Us

header ads

वार्ड क्रमांक 11 इंद्रा गांधी शाळेच्या समोर नाली तुंबल्याने पाणी थेट रस्त्यावर लहान मुलांचा व नागरिकांचा आरोग्य धोक्यात!


बीड स्पीड न्यूज 



वार्ड क्रमांक 11 इंद्रा गांधी शाळेच्या समोर नाली तुंबल्याने  पाणी थेट रस्त्यावर लहान मुलांचा व नागरिकांचा आरोग्य धोक्यात!

नगर परिषदेकडून नाली सफाई स्वच्छता कडे दुर्लक्ष


बीड |प्रतिनिधी -: बीड शहरामध्ये सायंकाळी झालेल्या पावसाने शहरांतील वार्ड क्रमांक 11 इंद्रा गांधी शाळेच्या समोर सर्वत्र रस्त्यावर आणि नाल्याला पुराचे रूप आले नाली तुंबल्या मुळे पाणी थेट रस्त्यावर आलं. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेकडून नाली सफाई आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यांवर पाणी 

साचल्याने नाली आणि रस्ता एकच झाला त्यामुळे अनेक नाल्यामध्ये पडून अपघात घडले. मात्र, किरकोळ पावसाच्या पाण्यानेही शहरातील वार्ड क्रमांक 11 इंद्रा गांधी शाळेच्या समोर नाल्या तुंबल्या असून नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. नगर परिषदेने पावसाळापूर्व नियोजन व्यवस्थित केले नाही. महिना महिना नाल्यांची स्वच्छता केली जात 

नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. येथे महाविद्यालय असल्याने नाल्यातील घाण पाण्यामुळे लहान मुलांचा व नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.पावसाळा सुरू होऊन अवघे दोन महिने लोटले आहेत.शहरातील अनेक परिसरातील नाल्यांची स्वच्छता झाली नसल्यामुळे नाल्यांना नद्यांच रूप आलं आहे. पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे नालीतील पाणी आता नागरिकांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊ लागले आहे.यामुळे वार्ड क्रमांक 11 

इंद्रा गांधी गल्ली  मधले नागरिक चांगलेच संतापले आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच नगरपरिषदेने मोठा गाजावाजा करत स्वच्छता मोहीम सुरू केल्याचे सांगितले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले असले तरी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम कुठल्या परिसरात राबवली असा प्रश्न आता या तुंबलेल्या नाल्या पाहून वार्ड क्रमांक 11 इंद्रा गांधी गल्ली नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा