Subscribe Us

header ads

गुजरवाडीचा पुल कोसळून एका वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


गुजरवाडीचा पुल कोसळून एका वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू 



माजलगाव|प्रतिनिधी-: मुसळधार पावसामुळे गुजरवाडीजवळील सरस्वती नदीला पूर आल्याने अचानक पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावाकडे परतणाऱ्या एका वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. बाबूराव रामकिसन नरवडे ( ६०, रा.गुजरवाडी ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने गावालगचे नदीनाले ओसंडून वाहत आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यात जोरदार पाऊस झाला. गुजरवाडी येथील नरवडे काही कामानिमित्त पात्रुड येथे आले होते. सात वाजेपर्यंत पाऊस थोडा कमी झाला. त्यामुळे बाबुराव पात्रुड येथून चालत गावाकडे निघाले.दरम्यान, गुजरवाडीजवळ असलेल्या सरस्वती नदीला मुसळधार पावसाने पूर आला होता. नदीवर एक जुना पूल आहे. त्यापुलावरून पाणी वाहत होते. बाबुराव यांनी धाडस करत पुलावरील पाण्यातून वाट काढली. मात्र, अचानक पूल कोसळल्याने बाबुराव नदीत पडले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने काही कळायच्या आत बाबुराव पुढे वाहत गेले.गावातील एकाने बाबुराव वाहून जात असल्याचे पाहिले. त्याने याची माहिती गावात दिली आणि शोधकार्य सुरू केले अंधारामुळे शोधकार्यात अडथळा आला. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बाबुराव यांचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर सापडला.गेल्या अनेक दिवसांपासून पूल दुरूस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती. मात्र प्रशासनाकडून कसलीच डागडुजी करण्यात आली नाही. अखेर पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेला. या घटनेत एका वृद्ध शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. दिवसा या पुलावर मोठी रहदारी असते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थानी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा