Subscribe Us

header ads

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर ॲप

बीड स्पीड न्यूज 


मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर ॲप

 

बीड|प्रतिनिधी-: दि. 14  नगरपरिषद/नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर मतदार यादीत आपले नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे यासाठी या मतदार याद्या ट्रू व्होटर (TRUE VOTER)  मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या वेळी प्रभागनिहाय मतदार यादीत आपले नाव शोधताना मतदारांची धावपळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.मतदार यादीत नाव शोधणे सोपे झाल्यास मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल. वरील पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी काळात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात TRUE VOTER मोबाईल ॲपव्दारे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्ये आपले नाव शोधण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲप प्ले स्टोर वरुन आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करता येते व त्याचा वापर सुलभरित्या करता येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा