Subscribe Us

header ads

महाराष्ट्रात सर्व शासकीय जिल्हा रुग्णालयात मोफत ब्लड बॅग करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी - बाळासाहेब धुरंधरे

बीड स्पीड न्यूज 


महाराष्ट्रात सर्व शासकीय जिल्हा रुग्णालयात मोफत ब्लड बॅग करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी - बाळासाहेब धुरंधरे

बीड प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अनेक जिल्हा रुग्णालयात रुग्णांना वेळेवर योग्य असा उपचार मिळत नाही सिरीयस पेशंट आलाच तर वेळेत डॉक्टर उपलब्ध नसतात त्यामुळे रुग्णाला मोठ्या प्रायव्हेट दवाखान्यात ॲडमीट करायची वेळ येते, त्यातच आपत्कालीन परिस्थितीत गरीब कुटुंबातील रुग्णांना शासकीय जिल्हा रुग्णालयात किमान ८०० रुपयांना ब्लड बॅग मिळते यातच कित्येक गरीब व सामान्य कुटुंबातील रुग्णांना वेळे अभावी व पैशा अभावी आपला जिव गमवावा लागतो. असाच प्रकार बीड मधील शासकीय जिल्हा रुग्णालयात अनुभवयास येतो बीड शासकीय रुग्णालयात ब्लड बॅग हि तब्बल ८०० रुपयांना रुग्णांच्या नातेवाइकांना दिली जाते आता हि रक्त पिशवी घेयचे शासनाने काही सोयीस्कर नियम बनवलेले आपणा सर्वांना माहीत कि जर कोणाला ब्लड बॅग लागत असेल तर  ब्लड डोनेट केलेले कार्ड आणा ब्लड बॅग मोफत घेऊन जा. ज्या लोकांचे सामाजिक, राजकीय लोकांसोबत संबंध ओळख असते असे लोक त्यांच्याकडुन ब्लड डोनेट कार्ड आनतात व बॅग मिळवतात व याचा झटपट लाभ घेतात, पण ज्या लोकांचा अशा राजकीय, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांशी कसलाही काडीचाही संबंध व ओळख नसते असे लोक कोठुन कार्ड आणतील मग अशा सामान्य - गरीब अत्यंत हालाकिच्या परीस्थितीचा लोकांना महाराष्ट्र शासनाने मोफत ब्लड बॅग करुन न्याय द्यावा या करता आज दि २२/०७/२०२२ ला रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश चे संस्थापक अध्यक्ष रोहित (ऊर्फ) बाळासाहेब धुरंधरे यांनी बीड मधुन कलेक्टर कायालया मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा, श्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे निवेदन मा, मुख्यमंत्री महोदय वाचुन याची योग्य ती दखल घेऊन सामान्य मानसाचा हिताचा विचार करुन संपुर्ण महाराष्ट्रातील शासकीय व जिल्हा तसेच तालुका रुग्णालयात मोफत व विनामूल्य ब्लड बॅग करतील अशी आशा आहे. या निवेदनात महाराष्ट्रातील गरीब रुग्णांची दशा व हालाकिच्या परीस्थितीचा लेखा जोखा निवेदनातुन थोडक्यात नमुद केला असुन रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष रोहित (ऊर्फ) बाळासाहेब धुरंधरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील सर्वच शासकीय रुग्णालयात ब्लड बॅग विनामूल्य व मोफत करावी अशी कळकळीची विनंती केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा