Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीच्या मोर्चाने बीड नगरपरिषद दनानली

बीड स्पीड न्यूज 


आम आदमी पार्टीच्या मोर्चाने बीड नगरपरिषद दनानली        

मा. मुख्याधिकारी  नगरपरिषद बीड यांनी स्वतः येऊन पाहणी करतो व तेथील जे काही प्रश्न असतील तात्काळ मार्गे लावतो अशा आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास पाठीमागे घेण्यात आले.  

बीड |प्रतिनिधी -: बीड हा मोर्चा बीड येथील तेलगाव नाका बार्शी नाका शिवराज पान सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या मार्गे बीड नगरपालिकेवरती धडकला आम आदमी पार्टीच्या वतीने गेल्या काही वर्षापासून बीड शहरातील विविध भागातील विविध प्रश्नाबाबत लोकशाही मार्गाने निवेदन देत आहे. मात्र आपण नगरपरिषद प्रशासनाकडून निवेदनाच्या माध्यमाने केलेल्या मागण्याकडे कानाडोळा केला आहे. या सर्व समस्या बीड नगर परिषदेने सोडवणे आवश्यक आहे. आपण आपले नगरपरिषद प्रशासन या 

मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. आम्ही आपणास सर्व निवेदनाच्या प्रति सह सर्व मागण्या सोडवण्यासाठी हे निवेदन देत असून आपण याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष दिलेले नाही म्हणून आम आदमी पार्टी व तेथील नागरिकांना सोबत घेऊन आज तेलगाव नाका ते बीड नगरपरिषद बीड पर्यात दि. 29 ऑगस्ट 2022 या दिवशी जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष सय्यद सादेक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सर्व प्रश्न सोडण्यासाठी आपल्या मुख्य अधिकारी नगर परिषद कार्यालय बीड मोर्चा व ठिय्या आंदोलन करत आहे. जो पर्यंत आपण योग्य न्याय देत नाहीत मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी स्वतः येऊन पाहणी करून प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले.                                               

मागण्या.....

मागण्या.भागातील पाण्याचा निचरा योग्य तो व्यवस्थापन करणे या भागातील नाणी व रस्ते दुरुस्त करणे या भागातील खंब्यावरच्या लाईट दुरुस्त करणे व नवीन लावणे  नळाचे पाणी व्यवस्थित न येणे व पाईपलाईन असून सुद्धा पाणी न सोडणे.  या मागण्यांचा पाठपुरावा आपण तात्काळ करावा माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष, अक्रम शेख उपाध्यक्ष रामधन जमाले सचिव, प्रा.ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री, सय्यद सादेक शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड, मिलिंद पाळणे, सचिन भिमराव कुठे तालुका अध्यक्ष, आजम खान उपाध्यक्ष, नीता बाई हजारे, आहेमदा कुरेशी, शेख सुलताना, आयेशा राणी, शायद कुरेशी, ज्ञानेश्वर शिंदे, शेख सद्दाम, अजीम शेख, पठाण इरफान, सादिक शेख, पठाण मकसूद, शेख अक्रम, शेख बळकिस, पठाण नुकसाना, शेख रफिक, सय्यद दौलत, इत्यादी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा