Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडीच्या बीड (प) महिला जिल्हाध्यक्ष पदी ॲड.अनिता चक्रे यांची निवड

बीड स्पीड न्यूज 


वंचित बहुजन आघाडीच्या बीड  (प) महिला जिल्हाध्यक्ष पदी ॲड.अनिता चक्रे यांची निवड


बीड प्रतिनिधी /  दि.२९ वंचित बहुजन आघाडी महिला आपाडी बीड पश्चिम च्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड.अनिता चक्रे यांची तर महासचिव पदी कल्पना गोरे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी जाहीर केली आहे.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहे. निवड प्रक्रियेची पुर्ण जबाबदारी  बीडच्या च्या निरिक्षक ॲड.लताताई बामणे यांनी पार पाडली. महिला आघाडीची उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.जिल्हाध्यक्षपदी ॲड.अनिता चक्रे,उपाध्यक्षपदी पुष्पा तुरुकमारे,जिजाबाई साळवे,महासचिव कल्पान गोरे,सहसचिव दिपाली तांगडे, सहसचिव नंदा भंडारे, सदस्य राजश्री लांडगे,भाग्यश्री डोंगरे, यांची निवड करण्यात आली या कार्यकारिणी मध्ये प्रत्येक गावातील किमान 5 कार्यकर्त्यांचा समावेश करून विस्तार करायचा आहे. त्यासाठी लवकरात लवकर कार्यकर्त्यांची नावे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सादर करावीत असेही या पत्रात म्हटले आहे. प्रत्येक स्थरावर समित्या नेमताना प्रत्येक गाव, शहर, गट, वॉर्ड/ वॉर्ड समुहा मधील प्रतिनिधी असेल याची दक्षता घ्यावी. 
 या नवनियुक्त कार्यकारिणी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे जिल्हा पदाधिकारी ज्ञानेश्वर कवठेकर पुरूषोत्तम वीर, संतोष जोगदंड,अनुरथ वीर धम्मानंद साळवे, भारत तांगडे,अंकुश जाधव, भीमराव चव्हाण, गोरख झेंड, बालाजी जगतकर,प्रा.गणेश खेमाडे, सुदेश पोतदार,बबनराव वडमारे, अजय सरवदे, दगडु गायकवाड, आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा