Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात  दिनांक 29 ऑगस्ट 2022,  सोमवार रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र काळे, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस,  महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ, डॉ. भीमराव माने यांची उपस्थिती होती. हॉकीचे जादूगर मेजर  ध्यानचंद यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.  प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच मेजर ध्यानचंद यांचे हॉकीमध्ये देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. प्रमुख अतिथी बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र काळे यांनी क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व नियमित शारीरिक व्यायाम, संतुलित आहार, योगासने, प्राणायाम यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.हुसैन एस. एस. यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवावे असे  सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी तर आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. फारूक सौदागर यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापिका डॉ. संध्या बिडकर, डॉक्टर अब्दुल समद डॉ.रमेश वारे, डॉ. सय्यद रफतअली, डॉ. शेख हुसेन,विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा