Subscribe Us

header ads

युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर

बीड स्पीड न्यूज 

युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर 

कडा (प्रतिनिधी) येथिल बाराभाई गल्लीतील मानाचा गणेश मंडळ म्हणून ओळख असलेला युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवराज गणेश मित्र मंडळ हे गत ५२ वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव प‌रंपरा जोपासत आले आहे. या मंडळाची यंदाची कार्यकारणी युवा आणि तरुणांच्या हाती सोपवली आहे. गणेशोत्सवाची कार्यकारणी नुकतीच मंडळांच्या जेष्ठ मंडळींनी जाहीर केली. यात अध्यक्षपदी ओंकार जठाडे उपाध्यक्ष पदी शुभम तारू तर सचिव पदी प्रतिक मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी युवराज गणेश मित्र मंडळाचे पाच वेळेस अध्यक्ष पदावर रहाणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद,ग्रा.प.सदस्य बंटी गायकवाड, पोलिस उप.निरीक्षक किरण राऊत,बाबु तारू,सागर बोराटे,संजय तारू,अल्ताब शेख, अविनाश ढोबळे, विश्वजीत परदेशी,ओम जाधव, आदित्य मोरे,ओम तारू, शुभम माने,तुषार तारू, तेजस माने, ओम गायकवाड,आयान शेख, विघ्नेश तारू,शोयब पानसरे, अफरोज शेख,सागर खामट,मुसेब पानसरे, महेश होळकर, तन्वीर खान, दर्शन दळवी व आदि सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा