Subscribe Us

header ads

जिल्ह्यात यंदाचा गणेश उत्सव दुर्घटना मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे-- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा


बीड स्पीड न्यूज 


जिल्ह्यात यंदाचा गणेश उत्सव दुर्घटना मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे-

- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

 

 जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

 

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर  निवड होणाऱ्या  मंडळाला “गणराय पुरस्कार”-जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

 

 जिल्ह्यात जवळपास दीड हजार सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सव साजरा करतील,

 

बीड | प्रतिनिधी  दि. २९ ::--जिल्ह्यात यंदाचा गणेश उत्सव दुर्घटना मुक्त व्हावा यासाठी प्रशासन, शांतता समितीचे सदस्य, पोलिस, शासकिय अधिकारी- कर्मचारी व नागरिक यासह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात गणेशोत्सव 2022 कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, गणेश उत्सवास दोन दिवस बाकी असून यापूर्वीच शासन व जिल्हा प्रशासनाने  दिलेल्या सूचनांची तालुकास्तरावरून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार शांतता समितीच्या बैठका, नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छता, पथदिव्यांची उपलब्धता, विसर्जन मिरवणूक मार्गांची व्यवस्था, महावितरणच्या माध्यमातून विजेचा तारा, वीज पुरवठा अगदी बाबत कार्यवाही याची संबंधित महसूल, पोलिस, नगरपालिका, महावितरणचे अधिकारी, यांनी काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले.ते पुढे म्हणाले, आपल्या देशात मुस्लिम ख्रिश्चन हिंदू धर्माचे अनेक उत्सव साजरे केले जातात या काळात दुर्घटनांची शक्यता वाढते. यामुळे नागरिकांनी अशा प्रसंगी सतर्कता बाळगून अपघात व दुर्घटना होऊ नये याची काळजी घ्यावी. विशेषता पुरेशी काळजी न घेतल्यामुळे विद्युत प्रणाली चा वापर तर करताना तसेच विसर्जन प्रसंगी नदी, तलाव येथे पाण्या मुळे होणाऱ्या अपघात, दुर्घटना होऊ नयेत यासाठी सतर्कता बाळगावी असेही जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले.जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर स्वतः मी व आपण पोलीस अधीक्षक यांनी बैठका घेतल्या आहेत. कोरोना कालावधी नंतर दोन वर्षानंतर हा उत्सव सार्वजनिकरीत्या मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. यावेळी काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. गणेशोत्सवासाठी वर्गणी बाबत तक्रार येऊ नये यासाठी देखील सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक मंडळांची नोंदणीची प्रक्रिया 31 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणेत येणार आहे. देशपातळीवरील व इतर ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा पडसाद जिल्ह्यात पडू नये. तसेच समाज माध्यमातील संदेश व इतर गोष्टींमुळे जिल्ह्यातील शांतता सलोखा बिघडू नये, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. अशा घटना निदर्शनास आल्यास त्याची माहिती प्रशासन व पोलिसांना दिली पाहिजे. विसर्जन मिरवणुका व उत्सव प्रसंगी वाद टाळण्याचे व शांतता समिती सदस्यांना प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.त्यांनी पुढे सांगितले, जिल्ह्यात जवळपास दीड हजार सार्वजनिक गणपती मंडळे गणेशोत्सव साजरा करतील असा अंदाज आहे. सार्वजनिक गणेशोत्सवा मंडळांसाठी नोंदणी शुल्क व लाऊड स्पीकर च्या वापरासाठी परवानगी साठी शुल्क प्रशासनाने माफ केले आहे.प्रत्येक पोलीस ठाण्याचा स्तरावर “गणराय पुरस्कार” दिला जाईल. पुरस्कारासाठी निवड स्थानिक पातळीवरील प्राध्यापक व मान्यवर नागरिकांचा सहभाग असलेली समिती परीक्षण करेल यामध्ये संबंधित गणपती गणेश मंडळ यांनी सादर केलेले देखावे, विसर्जन मिरवणुकीतील सहभागातील शिस्तबद्धता यासारख्या बाबींचा विचार केला जाईल, असे पोलीस अधीक्षक श्री ठाकूर म्हणाले.निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. तसेच यावेळी गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी विविध विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली. यामध्ये नगरपालिका, पोलीस, परिवहन, महावितरण, जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न औषध प्रशासन, महसूल, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागाच्या कामांबाबत सांगितले. जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व प्रत्येक तालुका स्तरावर संबंधित तहसीलदार हे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याचे सांगितले.अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच सर्व जिल्हा ठिकाणी तालुक्यातील शांतता समितांच्या बैठका घेण्यात आल्या असून गणेश उत्सव शांततेत होण्यासाठी सूचना दिल्या आहेत, बळजबरीने गणेशोत्सव वर्गणी वसुलीच्या घटना समोर आल्यास व तक्रार आल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले.याप्रसंगी शांतता समितीचे सदस्य ॲड. गणेश ढवळे, अनंत जोशी, श्रीमंत वाघमारे, सय्यद सलीम, श्री .धोंडे यासह पाटोदा, वडवणी, आष्टी येथील सदस्यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केले व सूचना मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने विद्युत पथदिवे, विसर्जन मार्ग व्यवस्था, स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे याबाबत प्रश्न मांडण्यात आले.बैठकीत यावेळी गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले. यामध्ये मोठ्या गर्दीच्या व सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, वीज पुरवठा नियमित होण्याच्या दृष्टीने उपाययोजना, विसर्जन विहिरी व पाण्याचे साठे येथील सुरक्षा व्यवस्था, विसर्जन मिरवणूक मार्गांची व्यवस्था, मिरवणुकांमधील वाहनांचे सुस्थिती, समाज माध्यमातील अफवांना प्रतिबंध, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी कार्यवाही, वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकांची सुसज्जता, निर्देशित केलेल्या दिवशी दारू विक्री प्रतिबंध, गाव पातळीवरील पोलीस पाटील यांनी त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर, बळजबरीने गणेशोत्सव वर्गणी  प्रतिबंध अशा विविध विषयांवर सूचना देण्यात आल्या.सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या सूचनांप्रमाणे नोंदणी करावी. तसेच या मंडळांसाठी राज्यस्तरावर स्पर्धा घोषित करण्यात आले असून त्यामध्ये जिल्ह्यातील मंडळांनी सहभाग घ्यावा याची ऑनलाइन नोंदणी करावी असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.

११ सप्टेंबर रोजी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे गणेशोत्सव मंडळांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ११ सप्टेंबर रोजी बिवृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे गणेशोत्सव बिंदुसरा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही बाजूस 16 किलोमीटर अंतर जवळपास ४५०० वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यामध्ये प्रशासन, स्वयंसेवी संस्था सहभागी होत असून यात सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आवाहन केले. येथे सहभागी झाले नाही तरी प्रत्येकाने आपआपल्या घरी वृक्षरोपे बनवण्यात भाग घेऊन मोहिमेत सहभाग द्यावा, असे ते म्हणाले.बीड जिल्ह्यातील वृक्ष राज्याची टक्केवारी एक ते दोन टक्के असून ही फार कमी आहे. जिल्ह्यातील वृक्षाच्छादन वाढण्यासाठी विविध पातळीवरून प्रयत्न होत आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील घरोघरी ५० वृक्षरोप तयार करून यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मियावाकी घनवृक्ष लागवड यशस्वी झाली आहे. यासह विविध ठिकाणी वृक्षलागवड वाढत आहे. याचा फायदा पुढील पिढ्यांना होईल क्रेडाई, रोटरी, जाणीव प्रतिष्ठान, इन्फंट इंडिया अशा स्वयंसेवी संस्था देखील पुढे येत आहेत, वृक्षलागवड व वृक्षसंगोपन यामध्ये सहभाग व सहकार्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा