Subscribe Us

header ads

ऊसतोड मजुरांकडून होणारी मुकदमांची फसवणूक थांबवा!

बीड स्पीड न्यूज 


ऊसतोड मजुरांकडून होणारी मुकदमांची फसवणूक थांबवा!

निर्व्यसनी मजुरांनाच मुकादमांनी उचल द्यावी - युवा मुकादम गौतम कांबळे यांचे आवाहन



बीड(प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांची संख्या जास्त असल्याने कारखानदारांना कामगार पुरवण्याकरिता मधला दुवा म्हणून मुकादम काम काम करत असतो. मात्र काही वेळा या प्रक्रियेत मुकादमांनाच आर्थिक नुकसानीचा सामना करण्याची वेळ येत आहे. यावर मुकादम संघटनेने तोडगा काढून निर्व्यसनी मजुरांनाच ऊस तोडणीसाठी उचल द्यावी असे आवाहन युवा मुकादम गौतम कांबळे यांनी केले आहे.व्यसनाधीन ऊसतोड मजुरांकडून मुकदमांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. उचलीच्या नावाखाली ऊसतोड मजूर मुकादमाला लाखोचा गंडा घालत आहेत. आपली चैन भागवण्यासाठी दोन-तीन  मुकादम यांच्या कडून उचल घेणे आणि शेवटी त्यांच्याकडे कानाडोळा करून पसार होणे असे प्रकार घडत असल्यामुळे मुकादमांवरच आर्थिक संकटाची वेळ आली आहे. काही मुकादम व्याजाने पैसे काढून मजुरांना ते पैसे पुरवतात अशा परिस्थितीत मुकादमांची फसवणूक झाल्यास दाद मागायची कोणाकडे? हा प्रश्न आता ऊसतोड मुकादम यांच्या पुढे उभा राहिला आहे. घेतलेल्या उचली बाबत ऊसतोड मजुरांना तू कामावर का येत नाही? हा प्रश्न विचारल्यास केस करण्याची धमकी देणे,आत्महत्येची धमकी देणे असे प्रकार घडत आहेत. यामध्ये मजुरांचे नेते म्हणून घेणारेही परत मुकादमांनाच जाब विचारतात. मग अशा परिस्थितीत मुकादमांनी काय करायचे? या प्रकाराची जिल्ह्यातील मुकादम संघटनेने गंभीर दखल घ्यावी आणि आपापसात संपर्क करून यापुढे व्यसनी ऊसतोड कामगारांना उचल देणे बंद करावे असे आवाहन युवा मुकादम गौतम अनिल कांबळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा