Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथील दलीत वस्ती विकासापासून वंचित

बीड स्पीड न्यूज 



प्रतिनिधी नवनाथ गोरे


वाकनाथपुर येथील दलीत वस्ती विकासापासून वंचित



वाकनाथपुर | प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाचे कामे होत नाहीत जागोजागी घान साचलेले आहे नाल्या सफाईचे काम होत. नाही नाल्या साफ नसल्याने मच्छर चे प्रमाण खूप वाढत आहे या वस्तीत पिण्याचे पाणी नाही ग्राम सभेत अनेक वेळेस प्रश्न मांडून देखिल कोणतेही काम होत नाही मिळतात फक्त आश्वासने बीड पासुन जवळच असणारे मौजे वाकनाथपुर येथील दलीत वस्ती विकासापासून वंचित आहे या वस्तीत मेन रोड सोडता बाकी रोड वरील रस्त्यावरची खडी उघडी पडली आहे. खडी उघडी पडल्याने नीट चालता येत नाही 

जागोजागी खड्डे पडलेले आहेत गेले वीस ते पंचवीस वर्षे झाले येथिल नालीचे काम झालेले नाही. आणि नाली सफाईचे काम देखील झालेले नाही या कारणाने नालीचे पाणी रोड वरून वाहत आहे. कामाची विचारणा केली तर फक्त आश्वासने भेटतात काम मात्र होत नाही या वस्तीत आणि या पूर्ण गावात पिण्याचे पाणी नाही काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून शेतातून पिण्याचे पाणी गावात आणले पण या दलीत वस्तीतील ९०% टक्के नागरीक ऊस तोडण्यासाठी बाहेर जातात तर येथील नागरिक पाणी कोठून आणणार दलीत वस्तीतील नागरीक पाऊस चालू असताना आज ही म्हाळस जवळा येथुन पिण्याचे पाणी आणतात तरी या दलीत वस्तीचा विकास करण्यात यावा अशी मागणी होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा