Subscribe Us

header ads

दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मुलासह मृत्यू

 बीड स्पीड न्यूज 


दोन कारची समोरासमोर धडक;  भीषण अपघातात महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मुलासह मृत्यू



अंबाजोगाई | प्रतिनिधी -:  सिरसाळा-परळी रोडवर आज सकाळी १०:३० च्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.दिंद्रुड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी कोमल शिंदे आणि त्यांचा ६ वर्षाचा मुलगाअथर्व या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली या अपघातात बीड येथील बालरोगतज्ञ डॉ. इलियास खान यांच्यासह दोघे जखमी झाले आहेत.माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी कोमल मारुती शिंदे (वय ३०) या आपल्या ६ वर्षाच्या मुलाला परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी कार क्र.(एमएच. १४ जीवाय ९११३) मधुन परळीकडे जात होत्या. त्याचवेळी परळीकडून बीडकडे येणारी इंडिवेअर क्र. (एमएच. ४७ क्यू ५३२६) या दोन्ही कारची समोरासमोर भिषण धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही कार एकमेंकावर आदळल्या. या अपघातात महिला पोलिस कर्मचारी कोमल शिंदे आणि त्यांचा ६ वर्षांचा मुलगा अथर्व मारुती शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या कारचा चालक नवनाथ लटपटे हे गंभीर जखमी झाले आहेत. इंडिवेअर कारमधील बीडचे बालरोगतज्ञ डॉ. इलियास खान हे देखील अपघातात जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात  उपचारासाठी हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा