Subscribe Us

header ads

वडवाडी येथे बळीराजा विज्ञान केंद्रात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

बीड स्पीड न्यूज 


वडवाडी येथे बळीराजा विज्ञान केंद्रात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

बीड -: नेकनूर पोलिस ठाणे हद्दीत वडवाडी येथे बळीराजा विज्ञान केंद्रात दि. 4 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून घरातील लोकांना मारहाण करून तब्बल 10 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.त्यानंतर उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा व बीड यांनी संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन करून टोकणी पेढी येथे काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी,दरोड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरफोडी झाल्या आहेत. दि. 4 ऑगस्ट रोजी नेकनूर पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या वडवाडी येथील बळीराजा विज्ञान केंद्रात पहाटेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर बेडरूममध्ये अभिमान शाहुराव आवचार यांची कृषी संस्था व शेती वडवाडी येथे आहे. त्यांच्या पत्नी तत्वशिला या त्यांच्या राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर बेडमध्ये झोपल्या असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून पत्नी तत्वशिला व पती अभिमान यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 10 लाख 60 हजाराचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. सदरील गुन्ह्याच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी समांतर तपास सुरू केला. तपास चालू असताना बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीतील गुन्हेगारांच्या वस्त्या चेक केल्या. गुन्हेगार वस्तीवर गुप्त बातमीदार नेमून बातमी दाराकडून वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेण्यात येत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता आरोपी नामे दत्ता रमेश शिंदे (वय 27), आकाश बाबु काळे (वय 22 रा. कोठाळवाडी महादेवनगर ता. कळंब जि.उस्मानाबाद) यांना कोठाळवाडी येथे ताब्यात घेतले. त्यांना नेकनूर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. तर याच घटनेतील सीसीटीव्ही फुटेज व आरोपीच्या वर्णनावरून स्थानिक गुन्हे शाखा व उस्मानाबाद गुन्हे शाखा यांनी काल मध्यरात्री टोकणी पेढी याठिकाणी कोंग ऑपरेशन राबवून संशीतांना ताब्यात घेतले. त्यांचे अभिलेखा पडताळणी केली असता पो.स्टे. पेठ ग्रामीण बीड गुरनं 118/2019 कलम 397,395,323,506 भादंविसह 4/25 भादंवि निष्पन्न आरोपी बलभीम बाबु काळे (वय 32), अनिल उर्फ राहुल अंकुश शिंदे (वय 25) दोघेही कोठाळवाडी महादेवनगर ता. कळंब जि. उस्मानाबाद हे आरोपी असल्याने त्यांना बीड ग्रामीण पोलिस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा