Subscribe Us

header ads

मराठा आरक्षणाचा महानायक हरपला विनायक मेटेंच्या अंत्यविधीस मंत्री रामदास आठवलेंची राहणार उपस्थिती : पप्पू कागदे

बीड स्पीड न्यूज 



मराठा आरक्षणाचा महानायक हरपला विनायक मेटेंच्या अंत्यविधीस मंत्री रामदास आठवलेंची राहणार उपस्थिती : पप्पू कागदे


बीड /  प्रतिनिधी-: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षे सातत्याने भूमिका घेणारे संघर्षशील नेते शिवसंग्रामप्रमुख  माजी आ.विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षणाचा महानायक हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत विनायक मेटे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान विनायक मेटे यांच्या अंत्यविधीस मंत्री रामदास आठवले  उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्याने एक संघर्षशिल नेता गमावला असून ती पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. आशा शोकभावना युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केल्या आहेत.माजी आ. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची दुःखद बातमी ही जीवाला चटका लावणारी आहे.अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी जीवाला चटका लावणारी अत्यंत दुःखद बातमी कळताच ना.रामदास आठवले यांनी आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून एमजीएम रुग्णालय येथे जाऊन दिवंगत विनायक मेटे यांच्या  पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.दिवंगत विनायक मेटे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार असून त्यांच्या अंत्यविधीस ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे महायुतीचे घटक पक्षाचे प्रमुख नेते होते.शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनी गरीब मराठा समाजाच्या प्रश्नासाठी नेहमी ठोस भूमिका घेतली. मराठा आरक्षणासाठी ते सतत लढत राहिले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले . मराठा आरक्षण परिषदेला ते उपस्थित राहिले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्य समर्पित करणारा एक झुंजार महानायक दिवंगत विनायक मेटे यांच्या रूपाने हरपला असल्याची शोकभावना  ना.रामदास आठवले, पप्पू कागदे यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. दरम्यान स्व. विनायकराव मेटे यांचा अंत्यविधी बीड येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे कॅनॉल रोड , सिद्धिविनायक पार्क येथे आज सोमवार दि. 15 रोजी दुपारी 3: 30 वाजता त्यांच्या मूळगावी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा