Subscribe Us

header ads

मुख्याधिकारी साहेब बीड शहरात तात्काळ स्वच्छता करा अन्यथा कचरा तेथे सेल्फी आंदोलन - बाळासाहेब धुरंधरे

बीड स्पीड न्यूज 



मुख्याधिकारी साहेब बीड शहरात तात्काळ स्वच्छता करा अन्यथा कचरा तेथे सेल्फी आंदोलन - बाळासाहेब धुरंधरे

बीड प्रतिनिधी : बीड शहरात सध्या सर्वत्र अस्वच्छता, कचरा, रस्त्यावर नाल्यांचे पाणी, रोडवर मेलेले जनावरे, सडलेला भाजीपाला, प्लास्टिक पिशव्यांचा ढिगारे, आल्याचे चित्र बीड शहरातील अनेक भागात समोर आले आहेत. त्यातच सध्या गणेश आगमन तोंडावरच आले आहे त्यामुळे शहरात तात्काळ स्वच्छता होणे गरजेचे आहे. बीड शहरात सगळीकडे अस्वच्छता वाढल्याने रोगराईने शहरात अनेक भागात चांगलेच तोंड वर काढले आहे. गणेपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने बीड शहरात तात्काळ स्वच्छता होणे फार गरजेचे बनले आहे. 

सविस्तर माहिती अशी की बीड शहरातील मुख्य बसटॅन्ड पाठीमागील रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रोडवरुन जात असताना सडलेल्या अवस्थेत कचरा, मरुन पडलेले जनावरे, रोड लगत घाण पाणी, सडलेले प्लास्टिक पिशव्यांचे ढिगारे अशे अनेक चित्रं आहेत. वर्षातील बारा महिने ईथे हिच परिस्थिती असते या रोडवरुन जातांना लोकांना अक्षरशा नाकाला दाबुन जिव मुठीत घेऊन जावे लागते ईथे दोन- मिनेट थांबने म्हणजे मोठ्या रोगाला आमंत्रण मिळणे आहे. अनेकदा बातमी व्दारे कळवुन सुध्दा बीड नगर परिषद ला इथे स्वच्छता करण्यास जाग आली नाही?? सध्या गणपती बाप्पा चे आगमन असल्याने अनेक गणेश मंडळाचे गणपती याच रोडवरुनच जाणार असल्याने इथे 

आता तरी स्वच्छता करावी अशी रुग्ण मित्र फांऊडेशन चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी मागणी केली आहे .त्यामुळे मुख्याधिकारी साहेब आता तरी येथे स्वच्छता अभियान राबवा व या रोडवर जरा दोन मिनिटे थांबुन पहा लोकांना काय त्रास होतो! जरा ईथे येऊन स्वतः पहा मगच आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्युक्ष थांबुन स्वच्छता करण्यास सांगावे असे नागरीकांचे म्हणणे आहे.तसेच बीड शहरातील पिंपरगव्हाण रोडवरील मुख्य रस्त्यावर, अनेक महिन्यांपासून सर्वत्र कचरा, नालीचे घाण पाणी, तुंबलेल्या गटार, अशा अनेक समस्या प्रलंबीत आहेत हा सर्व प्रकार मागील पंधरा दिवसांपुर्वी रुग्ण मित्र फांऊडेशन चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे अस्वच्छतेची ही सर्व परीस्थितीचा लेखा- जोखा सादर केला होता परंतु अद्याप एक महीना उलटला तरी बीड नगर परिषद चे एकही कर्मचारी ईकडे स्वच्छता करण्यासाठी फिरकलेला नाहीच?? एकवेळ नगर परिषद चा जेसीबी नाला साफ करण्याच्या नावाने आला व थातुर- मातुर नाली काढल्याचे दाखवुन अवघ्या दहा 

मिनिटातच धुम ठोकुन निघुन गेला. हीच आपली बीडची नगर परिषद ची स्वच्छता मोहीम आहे का.? असे प्रश्न चिन्ह नसुन साक्षात लोकांना येणारे देखे- जोखे पुराव्याचे हे सिन आहेत. ही सर्व बाब रुग्ण मित्र फांऊडेशन चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना भेटुन प्रत्यक्ष सांगुन निवेदन देऊन सुध्दा अजुनही कसलीच स्वच्छता करण्यास मुख्याधिकारी यांना जाग येताना दिसत नाही त्यामुळे मुग गीळुन गप्प बसण्याची भुमीका बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी यांनी घेतली का? असा सवाल जनतेमधुन होत आहे. त्यामुळे जर लवकर दोन दिवसांत मुख्याधिकारी यांनी या दोन्ही परीसरात स्वच्छता कर्मचारी पाठवुन तात्काळ स्वच्छता केली नाही तर आम्ही रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश च्या अंतर्गत बीड शहरातील अनेक भागातील अस्वच्छतेची परीस्थितीचा लेखा- जोखा जनतेच्या नजरेत आणुन देण्याकरता शहरभर नगर परिषद च्या नावाने कचरा तेथे सेल्फी दिंडी काढणार आहोत व लोकांना बीड नगर परिषद च्या स्वच्छता मोहीम चा खरा चेहरा लोकांसमोर आणणार आहोत असे रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी प्रसार माध्यमांद्वारे कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा